हैदराबाद : नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात देवीच्या मंदिरांना अनेक प्रकारे आकर्षक पद्धतीनं सजवलं जात आहे. त्यामध्ये विविध फुलांचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातोय. तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये कन्यका परमेश्वरी देवीची नवरात्री निमित्तानं भक्तांनी अर्पण केलेल्या दानाने सजावट करण्यात आली आहे. वर्षभरात देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या रुपयांच्या नोटांनी हे मंदिर सजवण्यात आलंय. एकूण 4 कोटी 44 लाख 44 हजार 44 रुपयांच्या नोटांनी देवीचं मंदिर सजवण्यात आलंय. केवळ देवीचा मखरच नाही तर मंदिरातल्या भिंतींवरही नोटांची सजावट करण्यात आलेय. 2000, 500, 200, 100 च्या नोटांची फुलं बनवून ते देवीला अर्पण करण्यात आलंय. या सजावटीची आता चांगलीच चर्चा सुरू आहे.





एबीपी समूहाची तेलुगु वेबसाईट असलेल्या एबीपी देसमने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिरात देवीला आणि तिच्या आजूबाजूच्या भिंतींना नोटांनी सजवण्यात आलं आहे. दुसरीकडे नेल्लोरमध्येही कन्यका परमेश्वरी देवीला नोटा, सोने आणि चांदीच्या माध्यमातून सजवण्यात आलं आहे. यामध्येही पाच कोटी 16 लाख रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. 


या नोटांच्या माध्यमातून देवीच्या मंदिरातील फुलांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच गाभाऱ्यातील भिंतीवरही नोटांच्या माध्यमातून अनेक आकर्षक गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या भव्यतेमध्ये अधिक भर पडल्याचं दिसून येतंय. 


देवीच्या मंदिराची सजावट करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा वापर केला जातोय. त्यामुळे या मंदिरांची सजावट पाहून अनेकांचे डोळे फिरले आहेत हे नक्की.  


महत्वाच्या बातम्या :