दिल्ली:  पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या अध्यक्षा  मेहबूबा मुफ्ती यांनी तपास यंत्रणांवर आरोप केले आहेत. मुफ्ती या ट्विट करून म्हणाल्या की, बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरूख खान  (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान केवळ त्याच्या खान या आडनावामुळे   टार्गेट केले जात आहे.  मेहबूबा मुफ्ती यांच्या या वक्तव्यावर आता दोन वकिलांनी दिल्ली पोलिस कमिश्नरांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


मेहबूबा यांचं वक्तव्य घृणा पसरवत आहे 
विनीत जिंदल आणि  अक्षिता या दोन वकिलांच्या मते, आर्यन खानबद्दल मेहबूबा यांनी केलेले हे वक्तव्य समाजात सांप्रदायिक घृणा पसरवणारे आहे. वकील विनीत जिंदल आणि अक्षिता यांनी पोलिस  कमिश्नर यांच्याकडे एफआयआर नोंदवून  मेहबूबा यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मेहबूबा यांनी असा दावा केला आहे की भारतीय जनता पक्षाच्या 'कोर' मतदारांना खुश करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे.


काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती
मेहबूबा यांनी ट्वीट केले आहे, 'चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोप केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी सर्व तपासयंत्रणा 23 वर्षाच्या मुलाचा तपास करण्यात व्यस्थ आहेत,  त्याचे कारण आर्यनचे आडनाव खान आहे. भाजपच्या मुख्य मतदारांना खूश करण्यासाठी मुस्लिमांना ट्रार्गेट केले जात आहे. '







क्रूझ ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत 19 जणांना ताब्यात घेतलंय 
क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत एकूण 19 जणांना ताब्यात घेतलं आहे. ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. गेल्या रविवारी गोव्याला जाणाऱ्या क्रूझ पार्टीत एनसीबीने छापा टाकला होता. त्यात आर्यन खानसह अनेकांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासह इतरांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एकूण 19 जण सध्या एनसीबीच्या ताब्यात आहेत.