Teacher's Day 2022 : आज शिक्षकदिनी यूजीसीकडून (UGC) शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचं काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पाच नव्या अनुदान आणि फेलोशिपची घोषणा केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नवीन संशोधन अनुदान आणि फेलोशिप योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. आज याबाबत अधिकृत घोषणा होईल. आजपासून तीन संशोधन अनुदान आणि दोन फेलोशिप सुरू केल्या जाणार आहे. दुपारी 3 वाजता या योजनांचा शुभारंभ होणार आहे.
यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, संशोधन अनुदान फॅकल्टी सदस्य आणि सेवारत शिक्षकांसाठी असेल. हे अनुदान तीन प्रकारचं असेल. तर फेलोशिप ही दोन प्रकारची असणार आहे.
UGC संशोधन अनुदान
निवृत्त प्राध्यापक सदस्यांसाठी फेलोशिप
या फेलोशिपचा उद्देश प्रोफेसर/सहयोगी प्रोफेसरच्या स्तरावर काम केलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 67 वर्षांपर्यंत असावं, त्यांनी 10 पूर्ण-वेळ उमेदवारांच्या पीएचडी प्रबंधांचे यशस्वीपणे पर्यवेक्षण केलेले असावे, ज्यापैकी तिघांनी गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या पदवी प्राप्त केल्या आहेत. अर्जदाराने मुख्य अन्वेषक म्हणून राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे निधी उपलब्ध करून दिलेले किमान तीन प्रायोजित संशोधन प्रकल्प देखील हाताळलेले असावेत. या उमेदवारांना दरमहा 50,000 फेलोशिप रुपये असेल आणि ही फेलोशिप 100 अर्जदारांसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. यामध्ये वार्षिक 50,000 रुपयांची विशेष तरतूदही असेल.
सेवेत असलेल्या शिक्षक सदस्यांसाठी संशोधन अनुदान
या संशोधन अनुदानाचा उद्देश नियमितपणे नियुक्त केलेल्या प्राध्यापक सदस्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या अनुदानासाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपर्यंत असावे. अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून अर्जदाराची विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेत किमान 10 वर्षे सेवा शिल्लक असावी. यासह त्यांनी पीएचडी पर्यवेक्षण केलेलं असावं. पाच पूर्णवेळ उमेदवारांचा शोध प्रबंध आणि राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय सरकारी किंवा खाजगी एजन्सीद्वारे अनुदानीत किमान दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले असावेत. हे संशोधन अनुदान 200 अर्जदारांसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. योजनेअंतर्गत मदतीची रक्कम 10 लाख रुपये आहे.
नवीन प्राध्यापकांसाठी डी.एस.कोठारी संशोधन अनुदान
या अनुदानामुळे नवनियुक्त सहायक प्राध्यापकांना कायमस्वरूपी पदांवर संशोधनाची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांकडे किमान पाच शोधनिबंधांसह पीएचडी पदवी असावी आणि अर्जदाराची पदावर दोन वर्षांपेक्षा कमी सेवा असावी. डॉ. डी.एस. कोठारी संशोधन अनुदान 132 उमेदवारांसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे आणि योजनेअंतर्गत सहाय्यता रक्कम 10 लाख रुपये आहे.
डॉ राधाकृष्णन यूजीसी पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप
ही पोस्ट डॉक्टरल फेलोशिप भारतीय विद्यापीठे/संस्थांमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मानविकी आणि सामाजिक विज्ञान, भाषांसह, प्रगत अभ्यास आणि संशोधन करण्याची संधी देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप तीन वर्षांच्या कालावधीसाठी 900 अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. महिला उमेदवारांसाठी 30% जागा राखीव असतील. या योजनेत, प्रति महिना रु. 50,000/- फेलोशिप रकमेसह 50,000/- प्रतिवर्ष विशेष तरतूद असेल.
उमेदवारासाठी पात्रता निकष
बेरोजगार उमेदवारांकडे पीएचडी पदवी असावी.
35 वर्षाखालील (सामान्य); आरक्षित श्रेणी / महिला / ट्रान्सजेंडरसाठी वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे.
UGC पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी प्रथमच अर्ज केलेला असावा.
पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य किमान 55% गुण; आरक्षित श्रेणी आणि ट्रान्सजेंडरसाठी गुणांमध्ये 5% सूट असेल.
उमेदवारांनी त्यांच्या पोस्ट-डॉक्टरेट संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक/पर्यवेक्षकांची निवड करणे आणि मेंटॉरशिपसाठी त्यांची संमती घेणे आवश्यक आहे.
सिंगल गर्ल चाइल्डसाठी सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप
या फेलोशिपचा उद्देश कुटुंबात एक मुलगी असलेल्या मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आणि त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करणे आहे. फेलोशिप प्रोग्राममध्ये स्लॉटची कोणतीही निश्चित मर्यादा नाही. ही फेलोशिप एकूण पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल.
उमेदवारासाठी पात्रता निकष
मान्यताप्राप्त विद्यापीठे/महाविद्यालये/संस्थांमध्ये कोणत्याही प्रवाहात/विषयामध्ये पीएचडी केलेली कुटुंबातील कोणतीही एक मुलगी, जी नियमित, पूर्णवेळ पीएचडी प्रोग्राममध्ये नोंदणीकृत आहे. ती या फेलोशिपसाठी अर्ज करू शकते. अर्जदार महिला उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा कमी (सर्वसाधारण श्रेणीत) आणि राखीव प्रवर्गातून अर्ज करत असल्यास 45 वर्षांपेक्षा कमी असावे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI