भोपाळ : आपल्या संपूर्ण जीवनात संघर्ष केल्यानंतर मुलं जेव्हा आश्चर्यकारक धक्के देतात तेव्हा त्याहून अधिक आनंदाची बाब कोणतीही नसते. अशीच एक प्रेरणादायी घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे.

एका चहा विकणाऱ्याच्या मुलीची भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांच मध्ये निवड झाली आहे. आंचल गंगवाल हे या मुलीचे नाव असून आंचलला निवडीसाठी तब्बल 6 वेळा प्रयत्न करावे लागले.

तब्बल एक लाख मुले या परिक्षेत सहभागी झाले होते. यातून फक्त 22 मुलांची निवड केली गेली. यातलीच एक आंचल आहे.


आंचलचे वडील म्हणाले की त्यांच्या विभागातील लोक त्यांच्या चहाच्या दुकानाबद्दल माहिती देतात आणि मुलीच्या यशाबद्दल त्यांना अभिनंदन करतात. याचाच त्यांना अभिमान वोटतो.