बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मधील एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून विषप्रयोग करण्यात आल्याची धक्कादायक बाब सर्वांसमोर आणली. तपन मिश्रा यांनी असा खळबळजनक दावा केला आहे, की 23 मे 2017 मध्ये इसरो मुख्यालयात पदाच्या बढतीसाठीच्या मुलाखतीदरम्यान, घातक आर्सेनिक ट्राइऑक्साइड देण्यात आलं होतं.


दुपारच्या भोजनानंतर देण्यात येणाऱ्या हलक्या खाद्यपदार्थांमधून त्यांना डोसासोबत देण्यात आलेल्या चटणीतून हा विषप्रयोग करण्यात आला होता, अशी शक्यता त्यांनी सर्वांसमक्ष मांडली. सध्याच्या घडीला मिश्रा, इस्रोमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अहमदाबाद य़ेथे इस्रोच्याच Space Application Centre (SAC)मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळत होते.


Farmers Protest | बैठकींचा खेळ खेळणाऱ्या मोदी सरकारला खेलरत्न द्या; शिवसेनेनं मोदी सरकारवर डागली  तोफ 


'बऱ्याच काळापासून दडवून ठेवलेलं गुपित'


मिश्रा यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्याला, 'बऱ्याच काळापासून दडवून ठेवलेलं गुपित' असं नाव दिलं. प्रा. विक्रम साराभाई, डॉ. एस. श्रीनिवासन, श्री. नंबिनारायण यांच्या मृत्यूभोवती असणाऱ्या सर्व चर्चांचा संदर्भ देत काहीसा असाच प्रकार आपल्यासोबतही घडू शकतो याचा विचारही केला नव्हता अशा शब्दांत त्यांनी मनातील भीतीही या पोस्टच्या माध्यमातून मांडली.


पुढं त्यांनी लिहिलं, 'माझ्यावर Arsenic Trioxide चा वापर करत 23 मे 2017ला 23rd May 2017 विषप्रयोग करण्यात आला होता. ज्यानंतर मला जवळपास दोन वर्षे यासाठीचा उपचार घ्यावा लागला होता. त्यामुळं मी याबाबत कोणाला काहीच बोललो नव्हतो. मी नशिबवान आहे, कारण अशा पद्धतीचा विषप्रयोग झाल्यावर सहसा जगण्याची शक्यता कमीच. मी जानेवारी महिन्यात सेवानिवृत्त होत आहे आणि मी इच्छितो की सर्वांनाच याबाबत माहिती व्हावी. कारण, माझा मृत्यू झालाच तर तो कशामुळं झाला, माझ्यासोबत काय घडलं होतं हे सर्वांनाच माहित असायला हवं.'



विषप्रयोग झाल्यानंतर अहमदाबादला परतलेल्या तपन मिश्रा यांना रक्तस्त्राव सुरु होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास अडचण, त्वचेचा एक थर निघणं, हात- पायाची नखं निघणं असा त्रास त्यांना होऊ लागला. न्यूरोलॉजिकल समस्या, जसंकी हापोक्सिया, हाडांचं दुखणं, स्पर्श, हलका हृदयविकाराचा झटका, शरीराच्या आत आणि बाहेरही फंगल इंफेक्शन जाणवू लागलं होतं.


कॅडिला अहमदाबाद, टाटा रुग्णालय मुबंई आणि एम्स दिल्ली येथून त्यांनी उपचार करुन घेतले. आपल्या या पोस्टसह तपन मिश्रा यांनी काही छायाचित्र आणि चाचण्यांचे अहवालही जोडले आहेत. सध्या त्यांच्या या पोस्टमुळं एकच खळबळ माजली आहे.