Tamil Nadu : सोशल मीडियावर (social media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करतात. हे व्हिडीओ शूट करताना अनेक घटना घडतात. काही लोक सेल्फी काढण्यासाठी किंवा व्हिडीओ शूट करण्यासाठी रेल्वे रूळा जवळ किंवा नदी, समुद्र असणाऱ्या ठिकाणी जातात. अशा धोक्याच्या ठिकाणी अनेक घटना देखील घडतात. अशीच एक घटना नुकतीच तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) घडली आहे. तीन मित्रांचा इंस्टाग्राम रील व्हिडीओ शूट करताना मृत्यू झाला आहे.
इंस्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी हे मित्र रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यावेळी रेल्वे खाली येऊन मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय 18 ते 24 वर्ष होते. एक प्रवासी रेल्वे एग्मोरहून जात होती. त्यावेळी हे तीन मित्र व्हिडीओ शूट करत होते.
महिंद्रा सिटी जवळील एका रेल्वे गेटच्या 1 ते 1.5 किमी अंतरावर ही घटना घडली. मृत्यू झालेल्या या तीन मित्रांपैकी एक मुलगा हा कॉलेजचा विद्यार्थी होता तर दोघे हे रोजंदारी कामगार होते. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही त्याचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासत आहोत की त्याने यापूर्वी असे व्हिडिओ अपलोड केले आहेत का? हे आम्ही पाहिले.' पुढे ते म्हणाले, 'या घटनेबाबत सीआरपीसी कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह चेंगलपेट सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. तिघांच्याही कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.'
महत्त्वाच्या बातम्या:
- Viral Video : काय सांगता? लोकल ट्रेनमधून घोडा प्रवास करतोय, व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
- Viral Video : ही दोस्ती तुटायची नाय... दिव्यांग मित्राला खांद्यावर घेऊन फिरवतात 'या' मैत्रिणी, व्हिडीओ व्हायरल
- ‘मूल जन्माला घालायचंय, पतीला सोडा’ तुरुंगात जन्मठेप भोगत असलेल्या पतीच्या पॅरोलसाठी पत्नीचं अजब कारण!