चेन्नई: तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळाची बैठक चक्क मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो समोर ठेवून घेण्यात आली. मुख्यमंत्री जयललिता यांची तब्बेत खराब असल्यानं, अर्थमंत्री पनिरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

मात्र, जयललिता यांची उणीव भासू नये, तसंच त्यांच्या अनुपस्थितीत बैठक पार पडत असल्यानं त्यांचा फोटो समोर ठेवण्यात आला होता. इतकंच नाही तर फोटोखाली 'सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं होत आहे' असं लिहिलंय.

जयललिता यांच्या प्रकृती बिघडल्यानं २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.