कोल्हापूर विमानतळाचं लवकरच टेक ऑफ, राज्याकडून तातडीने 55 कोटी
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 06:18 PM (IST)
नवी दिल्ली : कोल्हापूर विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी राज्य सरकार 20 टक्के हिस्सा म्हणून 55 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. त्यानतंर मुख्यमंत्र्यांनी निधी देण्यास तात्काळ मंजुरी दिली. दिल्लीत यासंबंधित झालेल्या बैठकीत एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी 274 कोटी रुपयांच्या कोल्हापूर विमानतळाच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने विमानतळाच्या विकास आराखड्यातील हिस्सा उचलावा, अशी अट घालण्यता आली होती. काल दिल्लीतील बैठकीत काय झालं? मुंबई ते कोल्हापूर या विमानसेवेला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या बठकीत हिरवा कंदील दाखवला. मात्र कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी पूर्ण निधी देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शविली होती. मात्र, आता राज्य सरकारने निधीचा 20 टक्के हिस्सा देण्यास मंजुरी दिली आहे.