TajMahal: जेव्हा परदेशातून लोक भारतात फिरण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्या भारतात आल्यावर भेट देण्याच्या यादीत ताजमहाल (Taj Mahal) हे ठिकाण नक्कीच असतं. फक्त परदेशीच नव्हे, तर ताजमहालला एकदा भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात देखील असते. ताजमहालबद्दल असणाऱ्या या क्रेझमुळे ताजमहालमध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. जर तुम्ही ताजमहालला भेट दिली असेल तर तुम्ही देखील तिकडची गर्दी नक्कीच पाहिली असेल. असं असताना, ताजमहालमधून किती पैसे कमावले जातात आणि ताजमहालच्या तिकिटांमधून भारत सरकारला किती महसूल मिळतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर आज त्याबद्दल जाणून घ्या.
कोरोना काळातही ताजमहालला भेट देणाऱ्यांची संख्या अधिक
ताजमहालमधून किती वार्षिक कमाई होते आणि भारतातील ऐतिहासिक वास्तूंमधून मिळणाऱ्या कमाईमध्ये ताजमहालचा क्रमांक कुठे येतो? हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया. खरं तर, ताजमहालची क्रेझ इतकी आहे की, जेव्हा कोरोनाचा काळ होता आणि लोक एक-दोन वर्षांसाठी कमी बाहेर जात होते किंवा घराबाहेर पडणं देखील टाळत होते, त्या काळातही ताजमहालची बरीच तिकिटं विकली जात होती आणि लोक ताजमहालला भेट देत होते. एएसआय (ASI) अंतर्गत 3 हजार 693 वारसा स्थळं आहेत, त्यापैकी 143 ठिकाणांना भेट देण्यासाठी तिकीट खरेदी करणं आवश्यक आहे.
ताजमहालच्या तिकिटांमधून जवळपास 150 कोटींची कमाई
अधिकृत आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमार 70 ते 80 लाख लोक ताजमहालला भेट देण्यासाठी येतात आणि त्यात सुमारे 80 हजार लोक परदेशी असतात. ताजमहालच्या तिकिटांबद्दल बोलायचं झालं, तर स्थानिकांसाठी 50 रुपये आणि परदेशींसाठी 1 हजार 100 रुपये तिकीट आकारण्यात येतं. 2017-18 ते 2021-22 या सुमारे 3 वर्षांत ताजमहालमधून 152 कोटी रुपयांची कमाई झाली. संपूर्ण ऐतिहासिक वास्तूंच्या कमाईच्या सुमारे 40 टक्के ही रक्कम होती. अहवालानुसार. ताजमहालला स्थानिक तिकीटातून 40 कोटी रुपये आणि परदेशी तिकिटांमधून 110 कोटी रुपये मिळतात.
आग्रा किल्लातूनही भारत सरकारला चांगला नफा
कमाईच्या बाबतीत ताजमहाल आघाडीवर आहे. 2021-2022 मध्ये ताजमहालच्या तिकिटांच्या विक्रीतून (Taj Mahal Ticket Selling) सुमारे 25 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ताजमहाल सोबतच आग्रा किल्ल्याचीही (Agra Fort) चांगली कमाई आहे आणि ताजमहाल आणि आग्रा किल्ल्याची विक्री एकत्र केली तर ती एकूण वारसा स्थळांच्या कमाईच्या 53 टक्के असेल.
हेही वाचा: