Rakesh Tikait Interview : 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळीही सर्व विरोधी पक्षांकडून पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) पुन्हा एकादा कुस्तीपटूंच्या आंदोलनानिमित्त सक्रिय झाले आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. टिकैत यांनी एबीपी न्यूजच्या प्रेस कॉन्फरन्स या कार्यक्रमात सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलन आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांवर दिलखुलास चर्चा केली.


एबीपी न्यूजशी बोलताना राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Pm Modi) एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील. पण मोदी आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाहीत. कारण ते मध्येच पदावरुन पायउतार होतील, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.


मोदी पंतप्रधापदावरुन होतील बाजूला : टिकैत 


या पत्रकार परिषदेत राकेश टिकैत यांनी सांगतले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान होतील. पण ते आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाहीत. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, "मोदींना आम्ही हटवणार नाही; तर मोदी स्वत: पंतप्रधानपदावरुन बाजूला होतील. याचं कारण मोदींना देशाचा राष्ट्रपतीही बनायचं आहे." 






2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी, यापैकी कोणी पंतप्रधान व्हायला हवं? या प्रश्नाचं उत्तर देताना टिकैत म्हणाले की, "आमच्या बोलण्यामुळे कोण कोणाला पंतप्रधान करणार नाही. या दोघांपैकी ज्या कोणाला लोक निवडतील, तोच पुढील पंतप्रधान बनणार आहे." ते पुढे म्हणाले की, ज्यांनी व्यवस्थेवर नियंत्रण मिळवलं आहे, तोच पुढील पंतप्रधान होईल."


मोदींपेक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगले - टिकैत


टिकैत यांनी देशाच्या पुढील पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदीनंतर कोण? असा सवाल उपस्थित विचारण्यात आला होता. यावर त्यांनी योगींना पंतप्रधान बनवा. मोदींपेक्षा तर बरे आहेत. तसंच "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काम केलं जाऊ देत नाही. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे," असा दावाही टिकैत यांनी केला आहे.


इतर बातम्या वाचा :


Rakesh Tikait : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकारची टाळाटाळ, राकेश टिकैत यांचा आंदोलनाचा इशारा