नवी दिल्ली : आर्य समाजचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश यांचं आज निधन झाले. 80 वर्षीय स्वामी अग्निवेश यांची मंगळवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती आणखी खालवली आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.
स्वामी अग्निवेश यांनी नवी दिल्लीतील इंस्टिट्यूट ऑफ लिवर अँड बिलेरी सायन्सेस (आयएलबीएस) मध्ये भरती करण्यात आले होते. ते लिवर सिरोसिसने ग्रस्त होते. उपचारादरम्यान मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी अग्निवेश यांना सायंकाळी सहा वाजता हार्ट अॅकट आला. शेवटी त्यांच्या मुख्य अवयवयांनी काम करणं बंद केलं. मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वरिष्ठ डॉक्टरांचं एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं मात्र त्यांची प्राणज्योत आज मालवली. साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
थोडक्यात माहिती
1970 मध्ये आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता.
1977- हरियाणा मध्ये शिक्षण मंत्री म्हणूनही पदभार.
2011- अण्णांच्या आंदोलनात सहभाग, मात्र नंतर मतभेदांमुळे दूर.
बिगबॉस मध्ये सुद्धा आले होते.