नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळाले असून सुशिल चंद्रा यांनी पदभार स्वीकारला आहे. सुशिल चंद्रा यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली असून सुनिल अरोरा यांचा कार्यकाल संपला आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी सुशिल चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. 


 




सुशिल चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाल हा पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत असून त्यांच्या कारकीर्दीत गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. 


केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त असतात. सुशिल चंद्रा यांनी 2014 साली निवडणूक आयुक्तीची जबाबदारी घेतली होती. निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात येते. त्याच आधारावर सुशिल चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे. निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती होण्यापूर्वी सुशिल चंद्रा हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे अध्यक्ष होते. 


सुशिल चंद्रा हे 1980 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलंय. 


महत्वाच्या बातम्या :