नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात वडील केके सिंह यांनी सुप्रीम कोर्टात लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. चितेला अग्नी देणारा हिरावून घेतला असल्याचे सुशांतच्या वडिलांनी सांगितलंय. पाटणा पोलिसांना FIR दाखल करण्याचा हक्क असल्याचे उत्तरात केके सिंह यांनी म्हटलंय. तपास पूर्ण झाल्यानंतर केस ट्रान्सफर होऊ शकते. पाटनामध्ये असताना अनेकवेळा सुशांतशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रिया चक्रवर्तीने CBI चौकशीची मागणी केली होती.


माझा मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही, शवविच्छेदनानंतरी त्यांनी FIR दाखल केली नसल्याचे केके सिंह म्हणाले. याअगोदर बिहार सरकार आणि रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात उत्तर दिले आहे.


बिहार सरकार म्हणाले, की मुंबई पोलिसांनी कोणतीही एफआयआर दाखल केली नाही. एकमेव एफआयआर बिहारमध्ये नोंदवली आहे. आता तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यामुळे पाटणावरुन केस मुंबईला ट्रांन्सफर करण्याची रियाची मागणीला अर्थ नाही.


Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती


तर रिया चक्रवर्ती म्हणाली, ''पाटणामध्ये तक्रार दाखल करण्याला काही आधार नाही. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची बिहार सरकारची मागणी देखील चुकीची आहे. एफआयआरमध्ये ज्या शक्यता व्यक्त करण्यात आल्या आहेत, त्यावरुन कोणत्याही गुन्ह्याची गोष्ट समोर येत नाही.


सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपासाचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सांगितले, की सर्व पक्षाचे वकील 13 ऑगस्ट म्हणजे आज आपापली बाजू संक्षिप्त स्वरुपात कोर्टात सादर करू शकतात.


सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील आपल्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. पाटाणा पोलिसांनीही एफआयआर दाखल केली आहे. याच एफआयआरला रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.


SSR Suicide Case | पहिला एफआयआर पाटणामध्ये, मुंबईत तापस का करायचा? : बिहार पोलीस