नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. मात्र नक्षल्यांच्या या भ्याड हल्ल्याला शेर मोहम्मद या जवानाने निधड्या छातीने प्रत्युत्तर दिलं.


शेर मोहम्मद यांनी 5 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलं. मात्र नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात स्वत: शेर मोहम्मदही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रायपूरमध्ये उपचार सुरु आहेत.

मोहम्मद यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना होत आहेत.

शेर मोहम्मद हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचे रहिवासी आहेत. शेर मोहम्मद हे सीआरपीएफच्या त्याच तुकडीचे जवान आहेत, ज्यावर पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मी (पीएलजीए)च्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?


शेर मोहम्मद यांनी नक्षलवाद्यांचा निधड्या छातीने सामना केलाच, शिवाय त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचाही जीव वाचवला.

https://twitter.com/ANI_news/status/856492325320630273

शेर मोहम्मद यांच्यावर उपचार सुरु असाताना, त्यांच्या प्रकृतीसाठी आख्खं बुलंदशहर प्रार्थना करत आहे. त्यांच्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत, मात्र त्याचवेळी अभिमानाचा हुंदकाही दाटून येत आहे.

"माझ्या मुलाने 5 नक्षलवाद्यांना ठार केलं. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. आख्खं गाव त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे", असं शेर मोहम्मद यांची आई फरीदा यांनी सांगितलं.

https://twitter.com/ANI_news/status/856707441026711552

शेर मोहम्मद लवकर बरे व्हावेत ही एकच मनोकामना संपूर्ण देश करत आहे. 

25 जवान शहीद 

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी 24 एप्रिलला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले.  तर 6 जवान गंभीर जखमी झाले.

सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सुमारे 300 नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते.

जेवण करताना हल्ला 

सुकमातील चिंतागुफामध्ये रस्ते बांधणीचं काम सुरु होतं. तेथील कामगारांना साहित्य पोहोचवण्यासाठी जवान निघाले होते. दुपारी जेवण करत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारही पळवली आहेत. जवानांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवादी नेहमीच बॉम्बहल्ला करतात, मात्र आज गोळीबार करत सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांना श्रद्धांजली

“छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला भ्याड आणि दुर्दैवी आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. प्राणांची पर्वा न करता चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांचा आम्हाला अभिमान आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

हल्ल्यामागे कोणाचा हात? 

नक्षलवाद्यांचा गड समजला जाणाऱ्या सुकमात जो हल्ला झाला त्यामागे कुख्यात नक्षली नेता हिडमाचा हात असल्याचं सांगण्यात येतं.  हिडमानेच 300 पेक्षा अधिक नक्षल्यांच्या साथीने हा हल्ला केल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीद


सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?