रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात CRPF च्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते.


25 जवानांच्या मृत्यूमागे कोण?

नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यातील 25 जवानांच्या मृत्यूमागे कुख्यात नक्षली नेता हिडमा याचा हात असल्याचं बोललं जात आहे. हिडमाने जवळपास 300 नक्षलवाद्यांसह मिळून हा हल्ला केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पापल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला (PLGA) संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना बुरकापाल आणि चिंतागुफा भागात सक्रिय असते.

कोण आहे हिडमा?

25 वर्षीय हिडमा हा पीएलजीएची पहिली बटालियन (PLGA 1) चा प्रमुख आहे. तो सुकमा जिल्ह्यातील पालोडी गावाचा रहिवासी आहे. घातपाताने हल्ला करणारा मास्टरमाईंड अशी हिडमाची ओळख आहे. हिडमा आणि त्याच्या बटालियनने आतापर्यंत CRPF वर अनेक मोठे हल्ले केले आहेत. दंतेवाडातील ताडमेटलामध्ये 2010 साली झालेल्या हल्ल्यात एक हजार नक्षलवाद्यांनी 76 जवानांची हत्या केली होती.

हिडमा ग्रुपने यापूर्वीही मोठे हल्ले केले आहेत. 23 मार्च 2013 रोजी दरभातील झीरम घाटीत काँग्रेस परिवर्तन रॅलीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह 31 जणांची हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातमी : छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीद