Sudan Violence: सुदानमधल्या (Sudan Crisis) यादवीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेणारं विमान मुंबईत दाखल झालं आहे. सुदानमध्ये गेल्या बारा दिवसांपासून अंतर्गत यादवी सुरू आहे. त्यामुळं तिथं वास्तव्यास असलेले भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) राबवण्यात येत आहे.
सुदानमधून 246 भारतीयांना घेऊन आलेलं विमान मुंबईत दाखल झाले आहे. सुदानमधील अंतर्गत युद्धामुळे तिथले भारतीय असुरक्षित आहेत. त्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे. या अंतर्गत IAF C17 ग्लोबमास्टर विमानाने 246 भारतीयांना परत आणलंय. केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. या अगोदर INS सुमेधाने 278 भारतीयांना आणलंय तर INS तेगने 297 भारतीयांना परत आणलं आहे.
मोदींचे मानले आभार
सुदानहून भारतात परतलेले प्रवासी केंद्र सरकारचे आभार मानत आहे. सुदानहून भारतात परतलेल्या एक ज्येष्ठ महिला प्रवासी प्रतिक्रिया देताना भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "भारत महान देश आहे. पंतप्रधान मोदींना दीर्घयुष्य लाभो". तर मुंबईत दाखल झालेल्या निशा मेहता यांनी मोदींचे आभार मानले.
भारतात परतल्याचा आनंद प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तीन हजाराहून अधिक अडकलेल्या भारतीयांनी सुरक्षित मायदेशी परत आणण्याचे निर्देश दिले होते.
1100 भारतीय सुखरुप परत
अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये आणावं लागंत आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. आतापर्यंत एकूण 1100 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :