नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारमध्ये सर्वात महत्वाचे निर्णय आता सुब्रमण्यम स्वामीच घेणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. याला कारण ठरलं आहे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागर अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर स्वामी यांनी केलेली टीका.


 

सुब्रमण्यम हे अमेरिकेत जाऊन भारतावर टीका करतात. त्यामुळे त्यांना आर्थिक सल्लागार पदावरुन हटवा अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना प्रमुख पदावर सरकाने नेमायला हवं होतं, पण तसं झालं नाही. त्यातचं दोन वर्ष होऊनही अर्थव्यवस्थेत हवे तसे बदल घडत नसल्याचं सांगंत स्वामी यांनी सुब्रमण्यम यांना हटवण्याची मागणी केली आहे.

 


 

 



 

याआधीही स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर टीका केली होती, त्यानंतर राजन यांनी गव्हर्नर पदाची दुसरी टर्म स्विकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे स्वामी करत असलेल्या वक्तव्यांवर एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.