जयपूर : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या शारीरिक थकव्याची तुलना बलात्कार पीडितेच्या वेदनेशी केल्याने देशभरात वादंग उठलं. सलमानच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफीही मागितली. मात्र राजस्थानमधील जयपूरच्या एका बलात्कार पीडितेने सलमानला सडेतोड उत्तर दिलं आहे.


 

 

एकेकाळी सलमान खानला सुपरहीरो मानणाऱ्या या महिलेने त्याच्या वादग्रस्त विधानानंतर म्हणाली की, 'तू (सलमान) तर माणूसही नाही...'.

 

सलमानच्या 'बलात्कार पीडित' विधानावर सलीम खान यांचा माफीनामा


 

सलमानच्या विधानावर बलात्कार पीडित काय म्हणाली?

 

31 वर्षीय बलात्कार पीडित रश्मी कपूर (नाव बदललं आहे) म्हणाली की, "सलमान, तुला त्या वेदना माहिक आहेत का ज्यात शारीरिकपेक्षा मानसिक जखमा मिळतात? अशी मानहानी ज्यात तुमची काहीही चूक नसते, पण त्या वेदनेमुळे तुम्ही आयुष्यभर मोकळेपणाने जगू शकत नाही.

 

 

गुन्हा दुसरा करतो आणि समाज आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतो. सलमान, तू ज्या शारीरिक वेदनेविषयी बोलत आहे, ती तुझ्या शौक आणि व्यवसायामुळे आहे, असंही रश्मी म्हणाली.

 


रश्मी पुढे म्हणाली की, "तुमची वेदना एक पेन किलरनेही दूर होऊ शकते. पण बलात्कार पीडितेच्या वेदना ना औषधाने बऱ्या होतात ना प्रार्थनेने. सलमान, तू कधीही या थकव्यामुळे स्वत:ला निर्जीव समजलं आहेस का? मी दररोज स्वत: या जिवंत समाजात मृत असल्याचं समजते. आतापर्यंत मी तुला सुपरहीरो मानत होते, पण तू तर मनुष्यही नाही."


'सुलतान'च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान


 

बलात्कारच्या दुर्दैवी घटनेनंतरही रश्मी खचली नाही. आत ती एका कॉर्पोरेट फंडिंगमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे.

 

 

सलमानचं वादग्रस्त वक्तव्य

‘सुलतान’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.

 

 

‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं,’ असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

 

सलमानच्या मुलाखतीतला ऑडिओ