Subhadra Kumari Chauhan: 


सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


या केवळ कवितेच्या ओळी नाहीत तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नवचेतना जागरुक करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या भावना होत्या. आणि हे लिहिणाऱ्या क्रांतिकारी कवयित्री होत्या सुभद्रा कुमारी चौहान. आज सुभद्रा कुमारी चौहान यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांच्यावरील डूडल प्रसारित करत अनोखी मानवंदना दिली आहे. 


सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला होता. त्या सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री आणि लेखिका होत्या. त्यांचे दोन कवितासंग्रह आणि तीन कथासंग्रह प्रकाशित झाले, पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 'खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी' या कवितेमुळे आहे. राष्ट्रीयत्वाची जाणीव असलेली ही कवयित्री. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात अनेकदा तुरुंगवासही सहन केला.  


सुभद्रा कुमारी यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी अलाहाबादजवळील निहालपूर नावाच्या गावात रामनाथ सिंह यांच्या जमीनदार कुटुंबात झाला.  लहानपणापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली.  सुभद्रा कुमारी चौहान यांना चार बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांचे वडील ठाकूर रामनाथ सिंह हे शिक्षण प्रेमी होते आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे सुरुवातीचे शिक्षणही झाले. खंडवाच्या ठाकूर लक्ष्मण सिंह यांच्याशी लग्न झाल्यानंतर 1919 मध्ये त्या जबलपूरला गेली. 1921 मध्ये गांधींच्या असहकार चळवळीत भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यात त्यांना दोनदा तुरुंगवासही झाला.  15 फेब्रुवारी 1948 रोजी एका कार अपघातात त्यांचे निधन झाले. 


सुभद्रा कुमारी चौहान  यांना मिळालेले पुरस्कार
सेकसरिया पुरस्कार (1931) 'मुकुल' (कविता संग्रहासाठी)
सेकसरिया पुरस्कार (1932) 'बिखरे मोती' (कविता संग्रहासाठी) 
भारतीय डाक विभागाने 6 ऑगस्ट 1976 रोजी  सुभद्रा कुमारी चौहान यांच्या सन्मानार्थ 25 पैशांचं डाक तिकिट जारी केलं आहे. 
भारतीय तटरक्षक दलानं 28 एप्रिल 2006 रोजी  सुभद्राकुमारी चौहान यांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेला सन्मानित करत एका नवीन तटरक्षक जहाजाला सुभद्रा कुमारी चौहान यांचं नाव दिलं आहे.


सुभद्रा कुमारी चौहान यांचं साहित्य
कथा संग्रह
बिखरे मोती - 1932
उन्मादिनी - 1934 
सीधे-साधे चित्र - 1947 
सीधे-साधे चित्र - 1983 (पूर्व प्रकाशित आणि संकलित-असंकलित सर्व कथांचा संग्रह)


कविता संग्रह
मुकुल
त्रिधारा
मुकुल तथा अन्य कविताएँ 


बाल-साहित्य
झाँसी की रानी
कदम्ब का पेड़
सभा का खेल