नवी दिल्ली : पंजाबच्या गुरदासपूरचे भाजपचे खासदार सनी देओल बराच काळ त्यांच्या लोकसभा मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यांच्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे. त्याकडे लक्ष द्यायला सनी देओल यांना वेळ नाही. मात्र त्यांनी महिंद्रा कंपनीच्या डीलरला पत्र लिहून सुजनपूरचे आमदार दिनेश कुमार बब्बू यांच्या मुलीला थार कार लवकरात लवकर द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. सनी देओल यांनी यासाठी लिहिलेले शिफारस पत्र सध्या व्हायरल होत आहे.
लोकांनी याबाबत सनी देओल यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. वास्तविक, हे पत्र खासदार सनी देओल यांनी यावर्षी 12 फेब्रुवारी 2021 रोजी लिहिले होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थार वाहनाची बुकिंग केल्यानंतर सहा महिन्यांनी वाहन डिलिव्हर केले जात आहे. पण आमदाराच्या मुलीला थार कार लवकर हवी होती, म्हणून सनी देओलने महिंद्रा कंपनीला पत्र लिहिले आणि थार गाडी लवकर देण्याची मागणी केली.
पत्रात काय लिहिलं आहे?
जे एस ग्रोव्हर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे पत्र पाठवण्यात आलं आहे. सुरभी ठाकूर ही दिनेश सिंग ठाकूर यांची मुलगी माझ्या ओळखीची आहे. तिने तुमच्याकडे महिंद्रा थार एलएक्स एचटी एमटी डिझेल मॉडेल बूल केलं आहे. तिला तुमच्या एजन्सीने 20 जानेवारी रोजी 21 हजारांची पावतीही दिली आहे. सुरभीला सध्या गाडीची फार गरज असल्याने तुम्ही तिने बूक केलेली गाडी तिला तातडीने द्यावी अशी मी विनंती करतो.
या संदर्भात, सनी देओलचे पीए पंकज जोशी यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, आमदाराच्या मुलीला गाडी घ्यायची होती. हे पत्र फेब्रुवारी महिन्यातील आहे आणि ज्या गाडीसाठी त्यांनी हे पत्र लिहिले होते ती गाडी घेतली नाही. हे पत्र रद्द करण्यात आले आहे आणि आता सुमारे 6 महिन्यांनंतर हे पत्र काही विरोधकांनी व्हायरल केले आहे. पंकज जोशी म्हणाले की ज्यांनी हे पत्र व्हायरल केले ते हे सांगणार नाहीत की खासदार सनी देओल यांनी सुजानपूरला एक कोटी रुपयांचा निधीही जारी केला आहे.
लोकांच्या प्रतिक्रिया
दिनेश खोसला, संजीव कुमार आणि नरिंदर कुमार नावाच्या तरुणांनी सांगितले की, खासदार सनी देओल यांना गुरदासपूरची आठवण झाली हे खूप चांगले आहे. आम्ही त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवले होते की कारण ते आमचे अपूर्ण काम पूर्ण करतील. पण सनी देओल खासदार झाल्यापासून ते गुरदासपूर, बटाला आणि पठाणकोटच्या लोकांना भेटायला एकदाही आले नाहीत. कोविडच्या काळातही सनी देओल यांनी लोकांची स्थिती विचारली नाही. सनी देओल यांनी लोकांसाठी काहीही केले नसले तरी सनी देओल यांनी आपल्या आमदाराच्य मुलीबद्दल नक्कीच विचार केला आहे. खासदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी शेतकऱ्यांविषयी कधीही बोलले नाहीत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली आहे.य