Delhi Airport : दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. मंगळवारी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) एक कार थेट इंडिगो (Indigo) विमानाच्या चाकाजवळ येऊन थांबली. सुदैवाने विमानाचे चाक आणि कारची धडक झाली नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.   


प्राथमिक माहितीनुसार, ही कार Go First एअरलाइनची होती. ही घटना विमानतळाच्या टर्मिनल T2 च्या स्टॅण्ड क्रमांक 201 वर झाली. या ठिकाणी Go First एअरलाइन्सची कार इंडिगोच्या A320neo या फ्लाइटच्या चाकाजवळ आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता, DGCA या प्रकरणाची चौकशी करणार आहे. 







कार चालकाची ब्रेथ एनालायझर चाचणी करण्यात आली आहे. कार चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे समोर आले. कार चालकाकडून हा अपघात झोपेत झाला का, याचीही चौकशी केली जात आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. त्याशिवाय विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. 


मंगळवारी, सकाळच्या सुमारास हे विमान दिल्लीहून पाटणासाठी उड्डाण घेणार होते. त्याच्या काही वेळेआधीच ही घटना घडली. सुदैवाने विमानाच्या चाकाला अथवा इतर कोणत्याही भागाला कारने धडक दिली नाही. विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी, काही विशेष कारणांसाठी कारचा वापर विमानतळावर केला जातो. त्यापैकीच ही कार असावी असे म्हटले जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: