Tips to Identify Fake PAN Card Number: भारतासह संपूर्ण जगभरात मागील काही वर्षात डिजिटलायझेशन  वेगाने होत आहे. मात्र, त्याचवेळेस डिजिटल फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. बनावट आधार कार्ड, पॅन कार्डचे प्रकरण समोर येत आहे. सध्या भारतात पॅन कार्ड हा आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. पॅन कार्डची आवश्यकता अनेक ठिकाणी भासते. 


बनावट पॅन कार्ड छापून वितरीत होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचीच दखल घेत आयकर विभागाने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून बनावट, खोट्या पॅनकार्डच्या प्रकरणात कारवाई करता येणे शक्य होईल. आयकर विभागाने आता पॅन कार्डसह क्यूआर कोड देणेही सुरू केले आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून तुमचं पॅन कार्ड खरं आहे की बनावट याची माहिती घेता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या एका अॅपची मदत घ्यावी लागेल. 


अशा प्रकारे जाणून घ्या, पॅन कार्ड खरं की खोटं ? 


- सर्वप्रथम, तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल.


- यासाठी तुम्ही प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in/iec/foportal वर जा.


- यानंतर तुम्ही Verify your PAN वर क्लिक करा.


- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.


- येथे तुम्हाला पॅनचा संपूर्ण तपशील विचारला जाईल, जो तुम्ही भरला पाहिजे.


- येथे तुम्ही पॅनकार्ड क्रमांक, नाव, DOB (जन्मतारीख) आणि मोबाईल क्रमांक टाका.


- यानंतर तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे आहे की नाही याचा एक मेसेज येईल. 


- यानंतर तुमचे पॅनकार्ड खरे आहे की बनावट हे सहज कळेल.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: