नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. ज्या उत्तर भारताने भाजपला केंद्रातील सत्तेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, त्याच उत्तर भारतात 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपचं कमळ कोमेजलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्क सहन करावा लागलेल्या भाजपला आणखी एक पराभव पदरात पडला.

उत्तर प्रदेशात विरोधकांच्या खेळीमुळे 30 वर्षांपासून योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूरमध्येही भाजपचा पराभव झाला. एकीकडे मायावती आणि अखिलेश यादव एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे 2019 साठी भाजपची चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेलं राज्य आहे. त्यामुळे भाजपसाठी ही चिंतेची बाब आहे.

सीएसडीएसचं आकडेवारीतून विश्लेषण

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (एकूण- 80 जागा)

भाजप+ 73

सपा 5

बसपा 0

काँग्रेस 2

सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2014 साली सपा आणि बसपा एकत्र असते तर (एकूण- 80 जागा)

भाजप+ 37

सपा+बसपा 41

काँग्रेस 2

सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2014 साली सपा-बसपा आणि काँग्रेस एकत्र असते तर (एकूण- 80 जागा)

भाजप+ 24

सपा+बसपा+काँग्रेस 56

उत्तर प्रदेशात 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी 325, सपा आणि काँग्रेसने 54, बसपा 19 आणि इतरांनी 5 जागा मिळवल्या. त्यामुळे सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2017 च्या विधानसभा निकालाचं लोकसभेच्या जागांमध्ये रुपांतर केलं तर.. (एकूण- 80 जागा)

भाजप+ 74

सपा 4

बसपा 1

काँग्रेस 1

सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2017 साली सपा आणि बसपा एकत्र असते तर (एकूण- 80 जागा)

भाजप+ 34

सपा+बसपा 45

काँग्रेस 1

सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2017 साली सपा-बसपा आणि काँग्रेस एकत्र असते तर (एकूण- 80 जागा)

भाजप+ 19

सपा+बसपा+काँग्रेस 61

संबंधित बातम्या :

‘अतिआत्मविश्वास नडला’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर योगींची प्रतिक्रिया


यूपीत भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव