मुजोर कॅब चालकाचा स्मिता ठाकरेंवर हल्ला, हल्लेखोर अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2018 07:09 PM (IST)
ठाकरे घराण्याच्या सूनबाई आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरेंवर बंगळुरुमध्ये एका कॅब चालकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे.
फोटो - सोशल मीडिया
बंगळुरु : ठाकरे घराण्याच्या सूनबाई आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरेंवर बंगळुरुमध्ये एका कॅब चालकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंगळवार दुपारच्या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर कॅब चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाल्या असताना कॅब चालकानं मोबाईलवर बोलण्याच्या नादात जोरदार ब्रेक मारला. यामुळे स्मिता आणि त्यांच्या मैत्रिणीला मोठा झटका बसला. त्यामुळे संतापलेल्या स्मिता ठाकरेंनी कॅबचालकाला फैलावर घेतलं. मात्र मुजोर चालकानं असभ्य भाषेचा वापर करत त्यांना मारहाण केल्याचंही पोलीस तक्रारीत पुढे आलं आहे.