नवी दिल्ली : ईशा फाऊंडेशनचे (Isha Foundation) संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांच्या मेंदूवर आपात्कालीन शस्रक्रिया करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. आता सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सदगुरू जग्गी वासुदेव यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.


सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर शस्रक्रिया


सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला मोठी सूज आल्याने त्यांच्यावर शस्रक्रिया झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्यांच्यावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं समोर आलं आहे. सदगुरू जग्गी वासुदेव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. मेंदूला सूज आल्याने त्यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आल्याची माहिती आहे.






दिल्लीतील रुग्णालयात दाखल


मेंदूला मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांना गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास सुरु होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदूला सूज आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर तात्काळ आपात्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.






गेल्या चार आठवड्यांपासून डोकेदुखीचा त्रास


गेल्या चार आठवड्यांपासून सद्गुरूंना डोकेदुखीचा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत असून सूज आहे, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. यानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या चार आठवड्यांपासून सद्गुरूंना डोकेदुखीचा तीव्र त्रास होत होता. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया वेळेवर झाली नसती तर, त्यांच्या जिवाला धोका होता. पण, आता त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.