Tirupati Online Ticket Booking : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजल्या जाणाऱ्या भगवान तिरुपतीच्या (Tirupati) दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक जातात. देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी विशेष पास सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. कधीपासून आणि किती कालावधीसाठी ही ऑनलाइन तिकीट विक्री सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर



विशेष दर्शन तिकिटांची बुकिंग कधीपासून?
तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीतर्फे तिकिटांचा ऑनलाइन कोटा आजपासून म्हणजेच 9 जानेवारी 2023 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येत आहे. आज सकाळी 10 वाजता ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुकिंग सुरू करण्यात येत आहे.  300 रुपये किंमत असलेल्या विशेष दर्शन तिकिटांची बुकिंग आज करण्यात येत आहे. तिरूपती तिरुमाला देवस्थान समितीकडून फेब्रुवारी 2023 महिना तसेच 12 ते 31 जानेवारी या कालावधीसाठी विशेष दर्शन तिकिटांचा ऑनलाइन कोटा जारी करण्यात येत आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन ऑनलाईन तिकिटे बुक करावीत असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.  मात्र, किती कोटा दिला जाईल, हे समितीकडून अद्याप जाहीर केलेले नाही.



या कालावधीत बालयममुळे दर्शनाला परवानगी नाही


22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत बालयममुळे दर्शनाला परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे. देवस्थानम समितीतर्फे सांगण्यात आले की, तिरुमला येथे गर्दी वाढत आहे, सध्या वैकुंठ द्वार दर्शन होत असून जे 11 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सरकारने कोविड निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून इथली गर्दी वाढली आहे. असं समितीचं म्हणणं आहे. 


 


तिकीटांची संख्या
तिरुपती देवस्थाना संस्थेने ऑनलाइन बुकिंगसाठी जाहिर केल्या जाणाऱ्या तिकीटांची नेमकी संख्या स्पष्ट केली नाही. त्यामुळे भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून तिरूपती मंदिराला दर्शनला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढवण्याचा दबाव तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेवर असणार आहे. 


 


ऑनलाइन बुकिंग कसे कराल?
-तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटच्या संकेतस्थळ ओपन करा. 
-नंतर त्यामध्ये मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा. 
-जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा. 
-तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला सहा अंकी ओटीपी भरा.
-त्यानंतर ‘लॉगिन’ वर क्लिक करा. 
-त्यानंतर तुम्हाला कॅलेंडर दिसेल. 
-त्यामध्ये बुकिंग डेट सिलेक्ट करा. 
-त्यानंतर तिथे दिसणारा अर्ज भरा.


 


इतर बातम्या


Weather Update : देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज