सोनूने केरळमधील या 177 मुलींना विमानाने त्यांच्या घरी पोहोचविण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे या सर्व मुली एर्नाकुलममधील एका फॅक्ट्रीमध्ये शिवणकाम आणि भरतकाम-विणकामांच काम करतात. या अडकलेल्या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका मित्राने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या सर्व मुलींना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केल्याबद्दल मला खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सोनूने एबीपी न्यूजला दिली.
या मुलींना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याने सरकारकडून भुवनेश्वर आणि कोची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सोनूने बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं.
सोनूने या सर्व मुलींना सुखरुप भुवनेश्वरला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी तात्काळ सरकारकडून भुवनेश्वर आणि कोच्ची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. परवानगी मिळताच या मुलींना कोची येथून जाण्यासाठी बंगळूरहून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली.
‘लॉकाडाऊनमुळे या सर्व मुली केरळमध्ये अडकल्या होत्या, पण आता लवकरच त्या भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचतील. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंद दुसरा कोणताही असू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया सोनूने दिली.
दरम्यान सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला होता. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचं आश्वासन दिलं. सोनूने केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Sonu Sood EXCLUSIVE कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलेला 'दबंग'सोनू सूद एबीपी माझावर!