नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या घटनेच्या चिंधड्या उडवल्या, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. सोनिया गांधी नांदेडमध्ये  माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या स्मृती संग्राहलयाच्या उद्घाटनासाठी सोनिया आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, डी. वाय. पाटील, मोहन प्रकाश, राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.

 

सोनिया गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • शंकरराव चव्हाणांना दुष्काळाची जाणीव होती, म्हणून त्यांनी सिंचनाची कामं केली - सोनिया गांधी

  • केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जनमताचा अपमान केला - सोनिया गांधी

  • नरेंद्र मोदींनी घटनेच्या चिंधड्या उडवल्या - सोनिया गांधी

  • शंकरराव यांची ओळख हेडमास्टर म्हणून होती- सोनिया गांधी

  • शंकरराव इंदिराजींच्या जवळचे झाले, कारण त्यांचं स्वच्छ चरित्र- सोनिया गांधी

  • दुष्काळाची जाणीव होती म्हणून त्यांनी सिंचनाची काम केली- सोनिया गांधी

  • आम्ही गरिबांसाठी ज्या योजना केल्या, त्या कमकुवत केल्या जात आहेत - सोनिया गांधी

  • शेतकरी आत्महत्या करतात आणि हे सरकार भांडवलदारांचं कर्ज माफ करतं आहे- सोनिया गांधी

  • आज शेतकऱ्यांना अधिक मजबूत केलं पाहिजे- सोनिया गांधी

  • शेकऱ्यांचा आवाज कॉग्रेस दाबू देणार नाही- सोनिया गांधी

  • केंद्र सरकारनं अरुणाचल आणि उत्तराखंडमध्ये जनमताचा अपमान केला- सोनिया गांधी

  • आम्हाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान आहे- सोनिया गांधी