जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला, यात एका उपनिरीक्षकासह 6 पोलीस शहीद झाले आहेत.


काश्मीरमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. या घटनेत २ नागरिकही जखमी झाले आहेत. १०- १५ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त असून हा हल्ला पूर्वनियोजित होता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस शहीद झाले आहेत.