Sikh IPS Officer : पश्चिम बंगालमध्ये एका शीख आयपीएस अधिकाऱ्याला 'खलिस्तानी' म्हटल्याप्रकरणी अज्ञात भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी झालेल्या वादानंतर शीख समाजाने कोलकाता येथील भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. संदेशखाली येथे भाजपविरोधात मोर्चा सुरु असतानाच कोणीतरी शीख आयपीएस अधिकाऱ्याला 'खलिस्तानी' म्हटले होते. त्यानंतर शीख समाजातील लोक चांगलेच भडकले होते. 'आज तक'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 


'मी पगडी घातली आहे, त्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात'


पश्चिम बंगाल येथील पोलिसांत स्पेशल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या जसप्रीत सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणत होते की,"मी पगडी घातली आहे, त्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात".


काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा आक्रमक 


पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. शिवाय ही घटना अतिशय लाजीरवाणी असल्याचेही बाजवा यांनी म्हटले होते. शिवाय त्यांनी ट्वीटरवर एक पोस्ट केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते आपले कर्तव्य निभावत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला 'खलिस्तानी' म्हणत आहेत, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. भाजप शीख धर्मींयाबाबत असाच विचार करत आहे का? असा सवालही बाजवा यांनी केलाय. शीखांना 'खलिस्तानी' दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही बाजवा यांनी केली आहे. 






आम आदमी पक्षाकडून जोरदार टीका 


आम आदमी पक्षाकडूनही या प्रकरणी खेद व्यक्त करण्यात आलाय. तुमच्या दिल्ली प्रदेश संयोजकाने म्हणजेच गोपाल राय यांनी म्हटले की, पगडी म्हणजे देशाच्या सुरक्षेचे गॅरंटी आहे. पगडी परिधान करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला 'खलिस्तानी'म्हटल्याप्रकरणी भाजपने देशाची माफी मागितली पाहिजे. भाजप नेत्यांमध्ये लोकांच्या जाती आणि धर्माबाबत किती द्वेष आहे, हे स्पष्ट करणारे आहे, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


द्वेषयुक्त भाषण होणार नाही, आयोजकांची हमी, भाजप तेलंगणा आमदार टी. राजसिंग ठाकूर यांच्या मिरारोडमधील मिरवणुकीस सशर्त परवानगी