PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा (PM KISAN) 16 वा हफ्ता कधी मिळणार याची तारीख समोर आली असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार आहे. आतापर्यंत 15 हप्ते जमा झाले असून हा 16 वा हप्ता असेल. या माध्यमातून केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये जमा होतात, तर त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. पण एकाच घरातील दोन व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो का किंवा एकाच घरातील वडील आणि मुलगा यांना या योजनेला लाभ घेता का असा प्रश्न अनेकदा पडतो.
नियम काय सांगतो?
एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघेही पीएम किसानचे लाभार्थी होऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर हे नाही असंच आहे. सरकारच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील एकाच सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो. पण जर वडील आणि मुलगा यांच्या नावावर वेगवेगळ्या जमिनी असतील, ते वेगवेगळे राहत असतील तर मात्र त्याचा लाभ त्यांना घेता येऊ शकतो.
अलीकडेच केंद्र सरकारने पीएम किसानच्या नियमांबाबत नोटीसही जारी केली आहे. त्यानुसार देशातील अनेक लोक पात्र नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झालंय.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता गेल्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. सरकारने आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. याचा फायदा 11 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. आता 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता मिळणार आहेत.
पीएम किसान योजनेची वेबसाईट
तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊन तपासू शकता. या वेबसाईवर PM किसान योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
जर शेतकऱ्यांना पीएम किसानशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करायचे असेल तर ते pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. त्याच वेळी सरकारने पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 जारी केला आहे. याद्वारे देखील शेतकरी कॉल करून संपर्क साधू शकतात आणि पीएम किसानशी संबंधित माहिती मिळवू शकतात.
ही बातमी वाचा: