Sidhu Moose Wala Postmortem : सिद्धू मुसेवाला यांच्या किडनी, यकृतासह 19 ठिकाणी गोळ्यांच्या जखमा, पोस्टमॉर्टम अहवालातून उघड

Sidhu Moose Wala Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा आणि जखमी झाल्यानंतर 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

Sidhu Moose Wala Postmortem Report : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुसा गावामध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या पोस्टमार्टम अहवालातून त्यांच्या मृत्यू संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा असल्याचं समोर आलं आहे. तसेच जखमी झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात उघड झालं आहे.

Continues below advertisement

पोस्टमार्टम अहवालातून समोर आलं आहे की, सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर 23 जखमांच्या खुणा होत्या. किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी गेळी लागली होती. 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढच्या भागावर लागल्या होत्या. तर तीन ते चार गोळ्या त्यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर लागल्या होत्या. त्यांच्या शरीरावर तीन ते पाच सेंमीपर्यंतच्या जखमा आढळल्या आहेत.

लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.

सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हत्या
पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola