खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्ट केलं.
फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्समध्ये जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट यांचा समावेश आहे. त्यामुळे आता रवींद्र गायकवाड यांना या विमानातून प्रवास करता येणार नाही.
VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद
एअर इंडियाने मला अडवून दाखवावं
दरम्यान, ब्लॅक लिस्ट केल्यानंतर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाला इशारा दिला आहे. रवींद्र गायकवाड म्हणाले की, "आज संध्याकाळी 4.15 वाजता मी पुन्हा एअर इंडियाच्या विमानाने जाणार आहे. त्यांनी मला अडवून दाखवावं."
"मी काहीही चुकीचं केलं नाही. त्यांनी चुकीचं केलं. त्यांनी माझ्याशी भांडण केल्यानंतरच मी मारहाण केली. मला याबद्दल जराही पश्चात्ताप नाही आणि मी माफीही मागणार नाही. जर त्यांनी यापुढेही असं केली, तर मीही पुन्हा असंच करेन. मी एअर इंडियाच्या संध्याकाळच्या विमानाने परत जात आहे. बघतोच मी ते मला कसे अडवतात. त्यांनी मला ब्लॅक लिस्ट करुन तर दाखवावं," असं रवींद्र गायकवाड म्हणाले.
काय आहे प्रकरण?
रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट असताना त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे.
एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार
कोण आहेत रवींद्र गायकवाड?
– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचीत आहेत
– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.
पाहा व्हिडीओ