Yoga as Sports in School : मध्य प्रदेशातील शाळांमध्ये योगाभ्यासाचे धडे गिरवले जाणार आहेत. योग हा मध्य प्रदेशातील शालेय शिक्षणाचा भाग असेल. शिवराज सिंह सरकार या दिशेने आणखी एक मोठं पाऊल उचलणार आहे. आता योग हा खेळ म्हणून विकसित करून शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे.
योग हा मध्य प्रदेशातील शालेय शिक्षणाचा भाग असेल. शिवराज सिंह सरकार या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. आता योग हा खेळ म्हणून विकसित करून शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत ही माहिती दिली.
खेळ म्हणून अभ्यासक्रमात समावेश
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "योग हा खेळ म्हणून विकसित करून शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल. मध्य प्रदेशात जन-जन पर्यंत योगाच्या विस्तारासाठी आयोग स्थापन करण्यात येईल. शालेय स्तरावर योगशिक्षणाची जोड दिल्यास शिक्षणाची गोडी लागण्यास आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला चालना मिळण्यास मदत होईल. मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थांमध्ये निरंतर सुधारणा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना विविध सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत व्यावसायिक शिक्षणासह नैतिक शिक्षण
मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की, शिक्षणाची गोडी लावण्याच्या या प्रयत्नांमुळे सर्वसामान्यांचे खाजगी शाळांकडे असलेलं आकर्षण कमी होईल. या दिशेनं सुरु असलेल्या उपक्रमांचे परिणाम लवकरच राज्यातील जनतेला दिसून येतील. शिक्षणाचे उद्दिष्ठ नागरिकत्वाचे ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये प्रदान करणं आहे. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणासोबत नैतिक शिक्षण देण्याची प्रभावी पद्धत अंमलात आणली जाईल.
विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा निर्माण करण्याची गरज : शिवराज सिंह
शिवराज सिंह म्हणाले की, "विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा निर्माण करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत शिक्षण पद्धतीमुळे काम करण्याची प्रवृत्ती आणि श्रमाबद्दल आदराची भावना कमी झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक कौशल्यं आणि महत्त्वाच्या व्यावसायिक कला शिकण्यासाठी स्पष्ट तरतूदी आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा आणि श्रम करणाऱ्या लोकांबद्दल आदराची भावना निर्माण होण्यास मदत होईल. टास्क फोर्सला या दिशेने गांभीर्याने काम करावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :