Great Escape From Agra : छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार  17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. परंतु, त्यासाठी त्यांनी आधी अनेक महिने योजना आखली होती. 


स्वराज्याची उभारणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात अनेक संकटे आली. काही संकटे अशी होती की महाराज यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण  झाली होती. अफजलखान प्रसंग, जयसिंगाची स्वारी अशी अनेक संकटे महाराजांवर कोसळली. परंतु या सर्व संकटामध्ये सर्वात मोठे संकट म्हणजे  “आग्र्याची कैद. औरंगजेबासारखा दगेखोर बादशहा, कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार, आशेचा एकही किरण महाराजांसमोर नाही. अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती. या  औरंगजेब बादशहाचा कपटी व दगेखोर स्वभाव त्यांना माहीत होता. कारण शिवाजीराजे अत्यंत मुत्सद्दी, माणसांची पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे होते. परंतु पुरंदरच्या तहाने महाराज कोड्यात अडकले होते.
 
शिवाजी महाराजांना नजरकैदेत टाकले गेले. त्यावेळी ते अशा कोड्यात अडकले होते की, प्रत्यक्षात मृत्यू डोल्यासमोर उभा होता. तो कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. 'शिवाजी महाराज यांना मारू नये, तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल, परंतु, इकडे देखील येऊ देऊ नये' असे पत्र  दख्खनेतून जयसिंगने औरंगजेबाला पाठवले होते. त्यानंतर औरंगजेब याने महाराजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. परंतु, महाराजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे महारांना ठावूक होते. परंतु, या कोड्यातून बाहेर पडण्यासाठी महाराज कोणती शक्कल लढवता येईल या विचारात होते. अखरे महाराजांना  एक युक्ती सुचली. त्यानुसार त्यांनी एक योजना आखली. परंतु, ही योजना अशी होती की, जर यशस्वी झाली तर महाराजांची सुखरूप सुटका होणार होती. परंतु, जर योजना फसली असती तर थेट औरंगजेबच्या हातीच लागणार होते.  


महाराजांबद्दल आग्र्याच्या बाजारात त्यावेळी अनेक अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता कील शिवाजी महाराजांकडे दैवी शक्ती आहे. ते 14 ते 15 हात लांब उडी मारू शकतात. एका झटक्यात 40 ते  50 कोस अंतर ते चालून जाऊ शकतात.  या अफवांमुळे बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत.


शिवाजी महाराज यांनी ठरवल्यानुसार योजना हळूहळू पुढे सरकत होती. 7 जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.


पाहा व्हिडीओ : शोध राजांच्या आग्रा भेटीचा, स्पेशल रिपोर्ट आग्र्याहून सुटका



अखेर तो दिवस उजाडला
 आग्र्याहून सुटकेचा तो दिवस अखेर उजाडला. महाराजांनी संपूर्ण तयारी केली होती. 17 ऑगस्ट 1666 चा तो दिवस. जवळपास एक हजार सैनिकांच्या खड्या पहाऱ्यातून शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडले होते. यासाठी महाराजांनी शक्कल लढवली होती ती म्हणजे मिठाईच्या पेटाऱ्याची. पेठाऱ्यात बसून महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटले होते. परंतु, अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराज हे पेठाऱ्यातून नाही तर पेठाऱ्याचे भाई बनून बाहेर पडले.  


अशी होती योजना
श्रीकृष्ण जन्मोस्तवानिम्मीत मिठाई वाटण्याचे महाराजांनी ठरवले. बादशहाकडे अर्ज करून हे आमचे पूर्वापार व्रत असून ते करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. बादशाहने देखील लगेच परवनागी दिली. मिठाई भरलेले   पेठारे आग्र्यातील प्रतिष्टीत मंडळी, सरदार , बादशाही वजीर, फकीर, साधू आणि गरीब जनतेकडे जाऊ लागले. मिठाई वाटपावेळी शिवाजी महाराजांच्या निवास्थानी गर्दी होऊ लागली. पाहरेकरी पेटारे उघडून पाहणी करत असत मगच पेटारे बाहेर जात असत. महाराजांनी मुलचंद सावकारामार्फात सर्व जडजवाहीर मोती, सोने, मोहरा दक्षिणेत पाठवून दिले. आता रोज पेठारे भरून मिठाई वाटण्यात येऊ लागली होती. त्यामुळे पहारेकरी पहिल्यासारखे कसून तपास न करताच एखाद दुसरा पेटारा तपासात व उर्वरित पेठारे तसेच जाऊ देत. हीच संधी होती शिवाजी महाराजांना तेथून सुटण्याची. 


महाराज मथुरेला रवाना झाले
16 ऑगस्ट रोजी रामसिंग शंभूराजांसोबत औरंगजेबाच्या दरबारी मुजऱ्यास गेला असता औरंगजेबाने महाराजांनी मनसब कबुल करून  त्यांच्याकडील किल्ले बादशहास सोपवून काबुलच्या स्वारीवर जावे असे आदेश दिले. परंतु,शिवाजी महाराजांनी बादशाहाचा हा आदेश नाकारला. औरंगजेबाचा हा शेवटचा इशारा शिवाजी महाराजांना समजला आणि0 त्यांनी अग्र्यातून निसटून स्वराज्यात परतण्याच्या मोहिमेला पूर्णस्वरूप देण्याचे ठरवले. 17 ऑगस्ट रोजी जुम्माचा दिवस असल्याने औरंगजेबाचा दरबार बंद होता. मशिदीत बादशाहसह सर्व जनता आणि दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते. शंभूराजे आज महाराजांसोबतच असणार होते. दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके दुखू लागले. प्रकृती ठीक नसल्याने महाराज झोपी गेले आणि एक मुलगा त्यांचे पाय चेपीत तेथे बसला. मथुरेतील ब्राम्हण आणि फाकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेटाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली. महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद  झोपी गेले. संध्याकाळच्यावेळी पेटारे मथुरेस रवाना झाले. त्यातील दोन पेटाऱ्यात शिवाजी महराज आणि शंभूराजे बसले. पहारेकऱ्यांनी पहिले दोन पेटारे तपासले व उर्वरित पेटारे ना तपासताच जाऊ दिले आणि महाराज बादशहाच्या कैदेतून निसटले.