Shiv Sena MP : संसदेतील शिवसेना कार्यालयात (Shivsena Office in New Delhi) आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale)  हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) , अरविंद सावंत (Arvind sawant) , अनिल देसाई यांच्यासोबत एकाच दालनात बसले होते. जरी ठाकरे आणि शिंदे असे दोन गटाचे खासदार एकत्र बसले होते मात्र ते एकमेकांशी बोलत नव्हते. आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. 


खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांनंतर ते ठाकरे गटाच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाचे पडसाद दिल्लीतून नागपूरमध्ये दिसून येत आहेत. शिवाय या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. असं असताना दिल्लीतील संसदेमधील कार्यालयात मात्र खासदार एकत्रित बसलेले दिसून आले आहेत. काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांना भेटायला जाण्यासाठी देखील ही खासदार मंडळी एकत्र आली नव्हती. 


शिवसेनेत दोन गट पडले असले तरी लोकसभेत शिवसेनेचे पक्ष कार्यालय अजून एकच आहे.  अधिवेशनाच्या दरम्यान खासदार कार्यालयात येत जात असतात.  आज दुपारी जेव्हा हे खासदार एकत्रित आले तेव्हाचा एक व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. 


खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांसह नेतेही आक्रमक झाले आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केलेल्या या वक्तव्यानंतर आज नागपूर अधिवेशनात देखील सत्ताधारी आक्रमक झाले होते. दिशा सालियान प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.


कार्यालयीन स्टाफचा पगार नाही, बँक अकाऊंटही फ्रीज


संसदेत शिवसेना पक्षासाठी एकच पक्ष कार्यालय आहे. या कार्यालयातल्या स्टाफचा पगार गेल्या पाच महिन्यांपासून झालेला नाही. दोन गटांच्या वादात ऑब्जेक्शन घेतल्या गेल्यामुळे बँक अकाउंट फ्रिज झालं आहे. त्याबाबत दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. 


याविषयी बोलताना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले की, लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयात सर्व शिवसेना सदस्य जात असतात. आम्ही आजही तिथं बसलो होतो. तिथं पक्षाच्या आणि लोकसभेच्या कामकाजाविषयी काय भूमिका घ्यायची याबाबत आमची चर्चा सुरु होती. 


व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


 



ही बातमी देखील वाचा


Rahul Shewale: बलात्काराच्या आरोपाप्रकरणी खासदार राहुल शेवाळेंची एसआयटी चौकशी करा; विधान परिषद सभापतींचे आदेश