West Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवड्यात 21 मार्चला बीरभूम जिल्ह्यातील रामपूर हाट येथे काही अज्ञातांनी घरे जाळली. या घटनेत दहा जणांचा जळून मृत्यू झाला. कोलकाता उच्च न्यायालयाने हत्याप्रकरणाची दखल घेत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत सीबीआयने 21 जण आरोपी असल्याचं सांगितले आहे. सीबीआयचे 30 सदस्यीय पथक पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे पोहोचले होते आणि त्यांनी हिंसाचाराचा तपास सुरू केला. गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात दहा घरांना आग लावण्यात आली होती. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला.


स्थानिक टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर उसळला हिंसाचार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःला तीन गटांमध्ये विभागून, डीआयजी अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने गावातील पूरबापारा भागाला भेट दिली जिथे स्थानिक टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर ही भीषण हत्या झाल्याचं समोर आलं आहे.


घटनेत दहा जणांचा मृत्यू


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक शनिवारी बोगतुई येथे पाच तास घटनास्थळी होते. पथक आधी सोनू शेखच्या घरी गेले आणि तेथे गंभीररीत्या जळालेल्या सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सीबीआयच्या पथकाने सोनू शेखच्या घराची तपासणी केली आणि तेथे मृत अवशेष आढळले, त्यानंतर ती शेजारील फतिक शेख आणि मिहिलाल शेख यांच्यासह इतरांच्या घरांचीही तपासणी करण्यात आली.


या घटनेमागे इतरही कारण?
सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CSFL) च्या कर्मचार्‍यांसह व्हिडीओग्राफी व्यतिरिक्त, सीबीआय टीमने परिसराचे थ्रीडी स्कॅनिंग केले आणि घटनास्थळावरून नमुने गोळा केले. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही आग घरांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी लावली होती की या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही तपास सुरु आहे.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेच्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येणार असून परिसरातील सर्व रहिवाशांची तपशीलवार यादी तयार केली जात आहे. प्रत्यक्षदर्शी आणि इतर गावकऱ्यांशी बोलणे आवश्यक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 


तपासासाठी सीबीआयचे पथक बीरभूममध्येच राहणार 
सीबीआयचे पथक तपासासाठी बीरभूममध्येच राहणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयचे दुसरे पथक रामपुर हाट पोलीस ठाण्यात जाऊन तपासासंदर्भात केस डायरी आणि इतर संबंधित कागदपत्रांचा अभ्यास करत आहेत.


सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी पोलिस महानिरीक्षक बी.एल. मीना आणि बीरभूम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नागेंद्र त्रिपाठी यांच्यासोबत बैठक घेतली. कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी बीरभूम हिंसाचाराचा तपास सीबीआयकडे सोपवला आणि तपासातील प्रगतीचा अहवाल सादर करण्यासाठी 7 एप्रिलची अंतिम मुदत दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha