PM Modi-CM Yogi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath)यांची जोडी कोणीही तोडू शकणार नाही, असे  वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांनी केले आहे. जनतेच्या प्रचंड पाठिंब्यानं भाजपनं उत्तर प्रदेशात सत्ता राखली असल्याचे त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 35 वर्षांनतर सलग दुसऱ्यांदा एका पक्षानं सरकार स्थापन केलं असल्याचे पटेल म्हणाल्या. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित होते. 


यूपीमध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे


नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलं यश मिळवलं आहे. पंजाब वगळता अन्य उत्तर प्रदेश, मणिपूर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपने सत्ता टिकवण्यात यश मिळवलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने 403 पैकी 273 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 255 जागा जिंकल्या, तर त्यांचे मित्र पक्ष निषाद पक्ष आणि अपना दल (एस) यांनी 18 जागा जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तीन दशकांत पहिल्यांदाच एका पक्षाने सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. यावर आनंदीबेन पटेल म्हणाल्या, मित्रांनो  उत्तर प्रदेशात आम्ही सरकार स्थापन केले आहे. मोदी-योगी जोडी कोणीही तोडू शकत नाही, हे कोणी करु शकत नाही. यासाठी अनेकांनी पाठिंबा दिला असल्याचे त्या म्हणाल्या.


उत्तर प्रदेशमध्ये 35 वर्षांनंतर असे घडले आहे की, एकाच पक्षानं सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करुन इतिहास रचला असल्याचे आनंदीबेन पटेल म्हणाल्या. ओलपाड तालुक्यातील वडोदरा येथे समस्त पाटीदार आरोग्य ट्रस्टने उभारलेल्या किरण मेडिकल कॉलेजच्या पायाभरणीसाठी आनंदीबेन पटेल सुरतमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या: