Shiv Sena : अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी ( Sudhir Suri ) यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंजाबमधील अमृतसर येथे शुक्रवारी ते गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्यामुळे निदर्शने करत होते. त्यावेळी गर्दीमधील एका व्यक्तीनं सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.  पोलिसांनी गोळी झाडणाऱ्याला अटक केली असून आरोपीनं कबुली दिली आहे. 


पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी ( Sudhir Suri ) यांच्यावर अमृतसरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सुधीर सुरी ( Sudhir Suri )हे अमृतसरमध्ये एका मंदिराच्या बाहेर निदर्शने करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर गोपाळ मंदिरासमोर असलेल्या घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं सांगितलं जातंय. पंजाबमधील आणखी एक शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्यावरही गुरुवारी प्राणघातक हल्ला झाला होता. अश्वनी चोप्रा यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर सायकलवरुन आल्याचं सांगण्यात आलं होतं. 


सुधीर सुरी अमृतसरमधील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते, असं सांगितलं जातंय. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता. पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती. या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला होता. 
 




दरम्यान, शिवसेना नेते सुधीर सुरी यांचे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी तयार नव्हते. परंतु जिल्हा प्रशासनाने कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि सुरक्षिततेचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  


आणखी वाचा : 


Shivsena : पंजाबच्या हिंदूंमध्ये शिवसेना, बाळासाहेबांचं आकर्षण नेमकं आलं कुठून? पंजाबमध्ये 15-16 शिवसेना नावाच्या संस्था