मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले की त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा केली असा प्रश्न संजय राऊतांनी शंका उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून 16 ऑगस्टला वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे संपादक राऊत यांनी वाजपेयींच्या निधनाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे कोणतेही स्पष्टीकरण किंवा कारण दिलेले नाही.
संजय राऊत काय म्हणाले?
वाजपेयी यांच्या मृत्यूची घोषणा एम्सने 16 ऑगस्टला केली आणि त्यावेळी त्यांच्या निधनाची वेळही जाहीर करण्यात आली होती. आपल्या लोकांऐवजी, राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम 'स्वराज्य'काय आहे हे समजून घ्यावे.
अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला निधन झाले, पण त्यांची प्रकृती 12-13 ऑगस्टपासून बिघडली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय शोक व्यक्त करत नाही किंवा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवत नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधायचे होते म्हणूनच वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्टला झाले किंवा त्याची घोषणा त्या दिवशी केली असे संजय राऊत म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेजी यांचं 16 ऑगस्टला निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांची टीम सध्या वाजपेयींवर उपचार करत होते. परंतु 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
संबंधित बातम्या
राष्ट्रीय स्मृती स्थळ इतकं महत्त्वाचं का?
वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती?
वाजपेयी म्हणाले होते 'राजीव गांधींमुळे मी जिवंत!'
'मेरे अटल जी', मोदींच्या ब्लॉगचं मराठी भाषांतर
पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी गांगुलीला 'हे' गाणं ऐकवलं
अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता
राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन
वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया
सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?
मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी
वाजपेयींच्या निधनाच्या तारखेवर संजय राऊतांचे प्रश्नचिन्ह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2018 08:36 AM (IST)
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे संपादक राऊत यांनी वाजपेयींच्या निधनाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे कोणतेही स्पष्टीकरण किंवा कारण दिलेले नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -