Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या इंग्रजीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा त्यांनी केलेल्या ट्वीटचा अर्थ समजण्यासाठी डिक्शनरी वापरावी लागते. शशी थरुर यांच्या इंग्रजीची सोशल मीडियावर चर्चा असते. त्यावरुन आतापर्यंत भन्नाट मिम्स आले आहेत. इंग्रजी म्हटले की नेटकऱ्यांना शशी थरुर हमखास आठवतातच. मात्र आता हेच शशी थरूर ट्वीट करताना चुकले अन् सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. umpire शब्द लिहिताना थरुर यांच्याकडून टायपो मिस्टेक झाली होती. यावरुनच नेटकऱ्यांनी थरुर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी गुरुवारी अॅशेस मालिकेसंदर्भातील एका व्हिडीओवर कमेंट केली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सध्या अॅशेस मालिका सुरु आहे. यामध्ये पंचाचा वादग्रस्त निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. बेन स्टोक्सने टाकलेला एक चेंडू नो असतानाही पंचाला कसा दिसला नाही? यावर क्रिकेट सेव्हन यांचा एक व्हिडीओ होता. या व्हिडीओवर कमेंट करताना शशी थरुर यांच्याकडून Umpiring या शब्दाच्या ऐवजी empires असा शब्द लिहिण्यात आला. नेटकऱ्यांना ही आयती संधीच मिळाली...त्यानंतर काय अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पडलाय.
पाहा शशी थरुर यांचं ट्वीट -
नेटकरी काय म्हणाले?
काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजीसाठी ओळखले जातात. त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे अनेकदा ट्विटरसह सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगते जगभरातील फॉलोअर्सच्या ज्ञानामध्ये थरूर ट्विटरवरुन भर टाकत असतात. मात्र, आता त्यांच्याकडून टायपो मिस्टेक झाल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे...