Rahul Gandhi Targeted PM Narendra Modi : संसदेत केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र डागलं. ओबीसींच्या (OBC) मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर (Congress) हल्ला चढवला. संसदेत भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ओबीसींच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसला लक्ष्य केलं आणि स्वत: ओबीसी असल्याचा उल्लेख केला आहे. ज्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


पंतप्रधान मोदी स्वत:ला म्हणाले 'सर्वात मोठा OBC'


अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. विरोधी पक्षांना तसेच काँग्रेसला फटकारताना पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीबाबत भाजपची (BJP) भूमिका स्पष्ट केली. तसेच विरोधकांच्या जात जनगणनेच्या मुद्द्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते स्वत: ओबीसी आहेत.


'ही मानसिकता बदलणं गरजेचं'


यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात की, देश फक्त दोन जातींमध्ये विभागलेला आहे - श्रीमंत आणि गरीब, पण आज संसदेत त्यांनी स्वत:ला 'सर्वात मोठा ओबीसी' म्हटलं आहे. कुणाला लहान तर, कुणाला मोठं समजण्याची ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मग ते ओबीसी असोत, दलित असोत किंवा आदिवासी असोत, त्यांची गणना केल्याशिवाय त्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळू शकत नाही. मोदीजी जर इकडंच-तिकडंच इतकं बोलतात तर, मोजणीला का घाबरतात?''






ओबीसी मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये कलगी तुरा


काँग्रेस आणि राहुल गांधी इतर मागासवर्गीय (OBC) मुद्द्यावरून मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. मोदी सरकारमध्ये किती ओबीसी अधिकारी आहेत, असा सवालही राहुल गांधींनी केला होता. यावर संसदेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'काँग्रेस आणि यूपीए सरकारने कधीही ओबीसींना न्याय दिला नाही. या लोकांनी ओबीसी नेत्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.'


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Suryoday Yojana : सोलर पॅनल योजनेद्वारे 18 हजार कोटी रुपयांची बचत, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार