Share Market News : पद्मा कॉटन यार्न लिमिटेडने (Padma Cotton Yarn Limited) गुंतवणूकदारांसाठी (Investors) बोनस शेअर्सची ( Bonus Shares) घोषणा केली आहे. कंपनीने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. कंपनी प्रति शेअरवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. पद्मा कॉटन यार्न पहिल्यांदाच अशा प्रकारचे बोनस शेअर्स देत आहे.
कंपनीने 2 डिसेंबर रोजी बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यासह एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. मात्र, बोनस जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया 2 महिन्यांत पूर्ण होईल. अशा स्थितीत रेकॉर्ड डेटही लवकरच जाहीर होऊ शकते.
सलग दुसऱ्या दिवशी शेअर्समध्ये तेजी
कंपनीच्या समभागांनी सलग दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी शेअर्समध्ये तेजी आहे. बीएसईमध्ये आज अपर सर्किट लागू झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 254.70 रुपयांवर पोहोचली. याआधी सोमवारीही पद्मा कॉटन यार्नचे शेअर्स अपर सर्किटला आले होते.
आठवडाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 10.36 टक्क्यांनी वाढ
कंपनीचे समभाग धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मागील एक आठवडा चांगला गेला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 10.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, अवघ्या 3 महिन्यांत कंपनीच्या स्थितीतील गुंतवणूकदारांकडून मिळणारा पैसा 227 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे दुपटीहून अधिक नफा मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 महिन्यांत 620 टक्क्यांनी वाढली आहे
गुंतवणूकदारांना आतापर्यंत किती नफा?
दोन वर्षांपूर्वी पद्मा कॉटन यार्नचे शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 1850 टक्के नफा झाला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक 3 वर्षात 2689 टक्के परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. तर या काळात सेन्सेक्स 97.98 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईमध्ये कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 254.70 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी प्रति शेअर 32.02 रुपये आहे.
गेल्या काही दिवसापासून शेअर मार्टेमध्ये तेजी
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शेअर मार्टेमध्ये तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होत असल्याचे दिसत आहे. ज्या ज्या कंपन्यांना चांगला नफा झाला आहे, अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला नफा देत आहेत. त्यामुळं गुंतवणूकदार मालामाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच पद्मा कॉटन यार्न लिमिटेडने (Padma Cotton Yarn Limited) या कंपनीला देखील मोठा फायदा झाला आहे. त्यामुळं कंपनीने गुंतवणुकदारांना एका शेअर्सवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.