एक्स्प्लोर

'पत्नीचा राग शांत करणं, आणि मैदानात विराटला डिवचणं धोक्याचं'

नवी दिल्ली :  आज लंडनमधील ओव्हल मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतला अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाची जोरदार तयारी सुरु आहे. पण मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तानचे दोन माजी दिग्गज क्रिकेटपटूंमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. एबीपी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचा माजी तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरमध्ये हा सामना रंगला. या चर्चेत शोएबच्या बाऊन्सरला वीराटने चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी वीरुनं विराट कोहलीला मैदानात डिवचण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर सेहवागने पाकिस्तानी संघाला धोक्याचा इशारा दिला. वीरु म्हणाला की, “पत्नीचा राग शांत करणं आणि मैदानात विराटला डिवचण्यात सर्वात मोठा धोका आहे.” वीरुच्या या वक्तव्यावर शोएबला काहीच बोलता आलं नाही. त्याने स्मित हास्य करुन, यावर उत्तर देणं टाळलं. विशेष म्हणजे, यावेळी वीरुने शोएबला भारतीय संघाने आजपर्यंत कोणत्याही मोठ्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावं लागला नसल्याची आठवण करुन दिली. पण त्यावर पाकिस्तानचा बचावाचा तोकडा प्रयत्न करत शोएबने भारतीय संघापेक्षा पाकिस्तानने एकदिवसीय सामने जास्त जिंकले असल्याचं सांगितलं. तसेच इतर सामन्याप्रमाणे या सामन्यात पाकिस्तानने भारताल हरवण्याचा विचार म्हणजे, जमीनीवर राहून आकाशातले तारे तोडण्यासारखं असल्याचं सांगितलं. कर्णधार विराट कोहलीचीही वीरुने यावेळी मुक्तकंठाने स्तुती केली. वीरु म्हणाला की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीत नेहमीच स्वत:चा दबदबा राखलाय. तसेच पाकिस्तानची कायमच वाट लावली आहे. दरम्यान, गेल्याकाही दिवसांपासून सेहवाग आपल्या एका ट्वीटवरुनही चर्चेत आहे. वीरुनं हे ट्वीट भारतीय संघाने बांग्लादेशचा दारुण पराभव केल्यानंतर केलं होतं. या ट्वीटमध्ये सेहवाग म्हणतो, “नातवांनी, चांगला प्रयत्न केला. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न चांगला होता. घरातलीच गोष्ट आहे. ‘फादर्स डे’ला मुलासोबत फायनल मॅच आहे. हा विनोद आहे, सिरियस होऊ नका.” विशेष म्हणजे, तब्बल दहा वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला आयसीसी टी-20 च्या अंतिम सामन्यात हारवलं होतं. त्यामुळे 2007 चीच पुनरावृत्ती करत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करुन चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव करावे, अशी सर्व चाहत्यांची इच्छा आहे. संपूर्ण कार्यक्रम पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Embed widget