Seema Haidar : भारतात असलेल्या सचिन (sachin meena) प्रेमात वेडी झालेली सीमा हैदर (Seema Haidar) नेपाळमार्गे तिच्या चार मुलांना घेऊन भारतात आली होती. दरम्यान, सीमा हैदर आता पाचव्यांदा आई झालीये. सीमाने नुकताच ग्रेटर नोएडा येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये तिच्या पाचव्या बाळाला जन्म दिलाय. ही आनंदाची बातमी मंगळवारी सकाळी चार वाजता सीमाच्या कुटुंबियांना मिळालीये. सध्या बाळ आणि सीमा चांगल्या स्थितीत आहेत. कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

Continues below advertisement


पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी पहिल्यांदा नेपाळ गाठलं होतं 


सीमा हैदर ही पाकिस्तानातून भारतात आली होती. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन मीणा यांची प्रेम कहाणी देशभर चर्चेचा विषय ठरली होती. सीमा 2023 मध्ये पाकिस्तानातून नेपाळला गेली आणि तिथून आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी भारताता आली होती. आता त्यांच्या प्रेमाची कहाणीला खरी रंगत आली आहे. दोघं चांगल्या पद्धतीने संसार करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.


सीमा हैदरच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण  


सीमा हैदरच्या कुटुंबामध्ये नवा सदस्य आल्याने त्यांच्या आनंदात आणखी भर पडलीये. सीमाला गर्भधारणा झाल्यानंतर  सचिन आणि त्याचं कुटुंब सीमाला रुग्णालयात घेऊन गेलं होतं. कुटुंबियांनी तिची चांगल्या पद्धतीने काळजी देखील घेतली होती. मुलीच्या जन्माने आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली असल्याचे तिच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. मुलाचा जन्म म्हणजे आम्हाला देवाने आशीर्वाद दिला असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुटुंबियांनी प्रार्थना देखील केली आहे. मात्र, अद्याप सीमा आणि सचिनने त्यांच्या मुलीचं नाव ठरवलेलं नाही. मात्र, लवकरचं ते एक कौटुंबिक कार्यक्रम घेऊन बाळाचं बारसं करणार आहेत. 


सीमा हैदरच्या मुलीला भारतीय नागरिकत्व मिळणार 


सीमा हैदर यांच्या अधिवक्त्याने म्हटलं होतं की, त्यांच्या मुलीला भारतीय नागरिकत्व मिळवून दिले जाईल. सीमा ही पाकिस्तानातील सिंध प्रांताची राहिवासी आहे. प्रेमासाठी भारतात आल्यानंतर तिला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिला जामीन मिळाला होता. नव्या बाळाच्या जन्माने तिच्या कुटुंबियांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या प्रेमाला आता नवी सुरुवात मिळालीये. सीमा हैदरचं हे पाचवं मुलं आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?