Karachi to Noida Movie : ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली आणि प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) तिचा प्रियकर सचिन मीनाला (Sachin Meena) भेटण्यासाठी थेट भारतात पोहोचली. या दोघांची प्रेमकहाणी (Love Story) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. आता या दोघांची ही लव्हस्टोरी मोठ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या प्रेम कहाणीवर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्य नावाची नोंदणीही करण्यात आली आहे.
आता मोठ्या पडद्यावर दिसणार सीमा-सचिनची प्रेमकहाणी
पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकहाणीवर चित्रपट बनवण्यात येणार असून या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. दिग्दर्शक अमित जानी यांनी आधीही सीमाला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यांनी सीमा हैदरला 'अ टेलर मर्डर स्टोरी' (A Tailor Murder Story) या चित्रपटाची ऑफर दिली आहे. या चित्रपटात सीमा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.
चित्रपटाचं नाव 'कराची-टू-नोएडा'
पाकिस्तानातून पळून भारतात प्रियकर सचिन मीनाला भेटण्यासाठी भारतात अवैधरित्या पोहोचलेल्या सीमा हैदरच्या पासपोर्टची पडताळणी अद्याप झालेली नाही. तिची कागदपत्रेही पाकिस्तानातून परत आलेली नाहीत. अवैधरित्या भारतात पोहोचल्यामुळे सीमा हैदर प्रकरणात दहशतवादी अँगलचा तपास सुरु आहे. असे असूनही सीमा हैदर आणि सचिन प्रसिद्धीझोतात आहेत. सीमा हैदर आणि सचिन यांच्यावरील चित्रपटाचे नाव ‘कराची ते नोएडा’ असं ठेवण्यात आलं आहे.
अमित जानी यांच्याकडून चित्रपटाच्या नावाची नोंदणी
मिळालेल्या माहितीनुसार, अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटासाठी नाव नोंदणी केली आहे. ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सीमा आणि अंजू (Seema Haider and Sachin Meena) यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवण्याचं काम सुरू केलं आहे. सीमा हैदरवर लवकरच ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे थीम साँगही लाँच होणार असल्याचंही बोललं जात आहे.
पाकिस्तानी सीमा हैदरची तुरुंगात रवानगी?
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी सीमाचा काही संबंध असल्याचा संशय आल्यास सीमाला तुरुंगात जावं लागू शकते. सीमा हैदरसोबतच तिला मदत करणाऱ्या आणि तिला आश्रय देणाऱ्या सचिन मीनावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. सीमाचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आहे. मात्र, ती पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयची गुप्तहेर असल्याचं तपासात अद्याप समोर आलेलं नाही. यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसकडून तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cross Border Marriage : सीमा आणि अंजूनंतर सीमेपलीकडची आणखी एक प्रेमकहाणी, जोधपूरमधील वकीलाचं पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न