नवी दिल्ली: कोरोनाशी संबंधित सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं कोरोना विरोधातली लढाई हे एक जागतिक महायुध्द असल्याचं मतं मांडलं. कोरोनासंबंधी आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची आणि मानकांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाली नसल्याने कोरोनाची महामारी एका जंगलाच्या वणव्याप्रमाणे भडकल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

Continues below advertisement


सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर कोरोनासंबंधी सुनावणी सुरु आहे. या खंडपीठात न्या. रेड्डी आणि न्या. शाह यांचा समावेश आहे. या खंडपीठानं म्हंटलं आहे की, "या कोरोनाच्या महामारीमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित झाला आहे. हे कोरोनाच्या विरोधातलं जागतिक महायुध्द आहे."


सर्वोच्च न्यायालयानं पुढ असं म्हटलं की, "राज्यांनी या काळात केवळ सतर्क राहून उपयोग नाही तर त्यांनी केंद्राशी समन्वय साधून काम केलं पाहिजे. नागरिकांची सुरक्षा आणि स्वास्थ हिच राज्यांची प्राथमिकता असायला हवी."


आता आरोग्य कर्मचारी थकले
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, "गेली आठ महिने कोरोना विरोधात लढणारे आरोग्य कर्मचारी आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकले आहेत. त्यांना आराम मिळेल अशी काही सोय करणे आवश्यक आहे.'


लॉकडाउन आणि कर्फ्यू लावण्यासंबंधी आपलं मत व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अशोक जैन यांच्या खंडपीठानं म्हंटलं की, "अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यापूर्वी, घोषणा करण्यापूर्वी नागरिकांना तशी कल्पना देणं आवश्यक आहे. त्यामुळे ते आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टींची व्यवस्था आधीच करु शकतील."


महत्वाच्या बातम्या: