Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा बहुचर्चित सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. अशातच आता हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे.


'मैं अटल हूँ'ची ओपनिंग डे कमाई किती? (Main Atal Hoon Box Office Collection Day 1)


'मैं अटल हूँ' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'मैं अटल हूँ' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाचे आकडे निराशाजनक आहेत. मात्र वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत चांगली वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


'मैं अटल हूँ' ऑनलाईन लीक (Main Atal Hoon Online Leak)


'मैं अटल हूँ' हा सिनेमा रिलीजच्या काही तासांनंतर लगेचच ऑनलाईन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'मैं अटल हूँ' हा सिनेमा टेलीग्राम, फिल्मीजिला, तमिलरॉकर्स आणि मूवीरुल्ज सारख्या साईट्सवर एचडी प्रिन्टमध्ये उपलब्ध आहे. या साईटवरुन प्रेक्षक 'मैं अटल हूँ' हा सिनेमा मोफत डाऊनलोड करू शकतात. 






'मैं अटल हूँ' ऑनलाईक लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा फटका बसला आहे. 'मैं अटल हूँ' या सिनेमाला परीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अटल बिहारी वाजपेयी यांचं आयुष्य 'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'द अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशियन अॅण्ड पॅराटॉक्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. मराठमोळ्या रवी जाधवने (Ravi Jadhav) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पंकज त्रिपाठीसह पीयूष मिश्रा आणि दया पांडे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर संदीप सिंह, विनोद भानुशाली आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


संबंधित बातम्या


Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' करमुक्त करा; राहुल नार्वेकरांचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र