Babies Born On 22 January : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाच्या प्रतिमेचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आता याच दिवशी बाळाला जन्म द्यायची इच्छा देशभरातील अनेक गरोदर महिलांनी व्यक्त केली आहे. या दिवशी बाळाला जन्म दिल्यास मूल भगवान श्रीरामांसारखंच (Ram) वैभवशाली आणि भाग्यवान होईल, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार याबाबत काय सांगितलं जातं? याचाही विचार व्हायला हवा. 


22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो? याबद्दल ज्योतिषशास्त्रातून जाणून घेऊया.


काय सांगते मुलांची पत्रिका?


ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी जन्मलेली मुलं खूप भाग्यवान असतील आणि त्यांचं नशीब लहानपणापासूनच उजळ असेल. या जन्मतारखेला जन्मलेली मुलं करिअरमध्ये अव्वल स्थानावर असतील. 22 जानेवारीला जन्मलेल्या मुलाची राशी खूप शुभ असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मकुंडलीचं विश्लेषण पाहिलं तर हा दिवस पौष शुक्ल पक्ष आहे आणि दिवस सोमवार आणि तिथी द्वादशी आहे. या दिवशी जन्मलेल्या मुलाची रास वृषभ (Taurus) असेल आणि त्यामुळे त्याच्या कुंडलीत चंद्र उच्च स्थानी असेल, जे मुलासाठी सर्वोत्तम असेल.


वयानुसार नशीब चमकणार


22 जानेवारी रोजी जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असेल आणि त्यांच्या कुंडलीत मेष रास असेल. देवगुरु हा चढत्या भावात असेल आणि तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या भावात कोणताही ग्रह नसेल. केतू सहाव्या घरात स्थित आहे. शुक्र सातव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे तो भाग्यस्थानात स्थित आहे. आठव्या घराचा स्वामी भाग्यस्थानात स्थित आहे. नवव्या घराचा स्वामी आरोह अवस्थेत आहे, म्हणजे लहान वयातच मुलाचं नशीब पालटण्यास सुरुवात होईल. सूर्य दशम स्थानात आहे. शनि सुद्धा स्वतःच्या घरात आहे आणि राहू बाराव्या घरात आहे.


या मुलांची पत्रिका सर्वोत्तम


राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी, म्हणजेच 22 जानेवारीला जन्माला येणार्‍या मुलांची कुंडली चांगली असेल. कुंडलीप्रमाणे, ही मुलं खूप भाग्यवान असतील आणि रामाप्रमाणेच मुलामध्ये देखील एक भव्य आणि महान व्यक्तिमत्वाचे गुण असतील, ते देखील जन्मत:च. नशीब त्यांना साथ देईल आणि ते महत्वाकांक्षी देखील असतील. त्यांच्या आयुष्यात ते सर्वोच्च स्थान निर्माण करतील.


पालकांचं नशीब पालटणार


22 जानेवारीला जन्माला येणारे बाळ आईसाठीही फार भागव्यवान असेल. बाळाच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत त्याच्या आई-वडिलांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. ग्रह चांगल्या स्थानी असल्याने गाडी घेण्याची संधीही चालून येईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : 'या' 3 राशींच्या महिला असतात सासूच्या लाडक्या; अगदी जवळच्या मैत्रिणीसारखं असतं नातं