श्रीश्री यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत राम मंदिर प्रकरणात नवा फॉर्म्यूला तयार करण्यात आल्याचं नदवी यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, नदवी यांना बोर्डातून बाहेर काढण्याचा निर्णय हैदराबादमध्ये झालेल्या एक्स्झिक्यूटीव्ह कमिटीत घेण्यात आला.
श्रीश्री रविशंकर आणि नदवी यांच्यात ८ फेब्रुवारीला रोजी झालेल्या बैठकीत वादग्रस्त जागेवर राममंदिर, तर मस्जिद दुसऱ्या जागेवर बांधण्याचा निर्णय झाल्याचं समोर आलं होतं. पण मौलाना सलमान नदवी यांच्या यावरील वक्तव्यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, अयोध्या प्रकरणावर येत्या मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावर हैदराबादमध्ये मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे बैठकांचे सत्र सुरु आहे.
अयोध्येतील राममंदिर प्रश्नाचा तिढा दोन्ही पक्षांच्या सहमतीनं सोडवला जावा, असं महत्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी व्यक्त केलं होतं. हा प्रश्न धर्म आणि आस्थेशी निगडीत असल्यानं न्यायालय त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. गरज पडलीच तर आम्ही मध्यस्थीची भूमिका पार पाडू, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं होतं.
सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेनंतर श्री श्री रविशंकर यांनी या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली होती.
तर राम मंदिराच्या वादावर चर्चा करण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महेंद्र गिरी यांच्यात सकारात्मक बैठक झाली होती. पण शिया बोर्डाच्या भूमिकेवर सुन्नी बोर्डानं आक्षेप घेतला होता.
संबंधित बातम्या
अयोध्या प्रकरणी सलग सुनावणीचा निर्णय होण्याची शक्यता
अयोध्येतील राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी
राम मंदिरावर तोडगा निघण्याची शक्यता, रविशंकर आणि योगींमध्ये चर्चा
राम मंदिर खटला संवेदनशील, सहमतीने सोडवा : सुप्रीम कोर्ट
राजकारणामुळे राम मंदिर रखडलं, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा
वर्ष अखेर अयोध्येत राम मंदिर उभारणी सुरु : सुब्रह्मण्यम स्वामी
अयोध्येतील राम मंदिर खुलं करणं ही राजीव गांधींची चूक : राष्ट्रपती
राम मंदिर बनवा, देशाला आयसिसपासून वाचवा : तोगडिय